मराठवाड़ाराजकारण

जिंतूरमधून उमेदवारीसाठी काँगेसच्या सुरेश नागरेची जुळवाजुळव

परभणीच्या जिंतूरमधील राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. काँग्रेसचे आमदारकीसाठी इच्छूक उमेदवार सुरेश नागरे यांनी स्वत:च्या उमेदवारीसाठी जुळवाजुळव सुरु केली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांच्यासह तीन नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी काँगेंसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे नेते सुरेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला आहे.यावेळी आता शेवटपर्यंत याच\

जिंतूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांच्यासह धनगर समाज उन्नती मंडळ परभणी जिल्हाअध्यक्ष अनंतराव कोरडे, कवडा सरपंच राजेश चव्हाण, नगरसेवक नियाजू खान गफुर खान उर्फ न्याजुलाला, नगरसेवक अफसर बेग, नगरसेवक सेलू रहीम खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते याया खान, अयुफभाई सदर,  सय्यद मुस्ताफा आदींचा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश भैया नागरे, जिल्हाकार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, विशालराव बुधवंत, शहराध्यक्ष बासू खान, सुधाकर नागरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button