देश -विदेशमुख्य बातमी

लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे, अमित शाह यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन असलेल्या लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी या संदर्भात घोषणा केली. सुलभ प्रशासनासाठी हा निर्णय गृह मंत्रालयाने घेतल्याची माहिती आहे.

एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवर अमित शाह यांनी घोषणा करताना म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

झंस्कर (Zanskar), द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग (Changthang) हे नवीन जिल्हे प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील. मोदी सरकार लडाखच्या नागरिकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button