
विरारमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. विरारमध्ये (Virar) एका कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
राजेश कासट असं 46 वर्षीय प्राध्यापिकेचं नाव आहे. आत्मजा कासट उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारनं त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. कारचालकानं त्यांना नजिकच्या रुग्णालयात नेलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील याला अटक केली आहे.


