
गंगापुर प्रतिनीधी
गंगापूर तालुक्यातील पुरी गावात अवैधरीत्या देशी दारू मोठ्या प्रमाणात सुरू होती गावातील महिलांनी एकत्र येऊन देशी दारूच्या दुकानाची तोडफोड केली होती.
त्या ठिकाणी काही वेळात पोलिसांनी येऊन मध्यस्थी करून महिलांना शांत केले होते.पोलीस प्रशासनाच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज पुरी गावात दारू सह गुटखा १०० % बंद झाला याबद्दल पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले,बीट आमलदार विजय पाखरे,गोपनी शाखेचे मनोज नवले,पोलीस नाईक अनिरुद्ध शिंदे,विष्णू बापटे,राहुल वडमारे,महिला पोलीस दांडगे मँडम,धारकर मँडम,पत्रकार विशाल जोशी,पोलीस पाटील अब्बास पटेल,यांचा ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशा व फटाक्याच्या आतशबाजीने गावात मिरवणूक काढून सत्कार केला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजेन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.गावकरी महिलांनी आमची दिवाळी आजच आहे आमचा पाठीशी तुम्हीच आमचे भाऊ धाऊन आले व आम्हाला हिच भाऊबीजीची भाऊबीज भेट दिली अशी भावना महिलांनी व्यक्त केली.यावेळी सरपंच वंदना राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मोरे, लक्ष्मीन मोरे, रशिद पटेल, श्याम मोरे, सखाराम मोरे, युसुफ पठाण, ज्ञानेश्वर मोरे, गोकुळ मोरे, दत्तू आढाव, एकनाथ राऊत,अक्षय मोरे, सुनीता गिरी, मुक्ता राऊत, शकुंतला राऊत, रेखा राऊत, हिराबाई राऊत, शेख आलिशान, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब गिरी तर आभार प्रदर्शन तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मोरे यांनी केले.



