
छत्रपती संभाजीनगर,प्रतिनिधीःमहावितरणच्या 2022-23 मधील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर परिमंडलाचा संघ शनिवारी (30 डिसेंबर) निवडण्यात आला. यासाठी झालेल्या निवड चाचणीत सव्वाचारशेहून अधिक कर्मचार्यांनी सहभाग घेतला. त्यातील 136 कर्मचार्यांची छत्रपती संभाजीनगर येथे फेब्रुवारीत होणार्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवड चाचणीस ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, नांदेड परिमंडलाचे प्रभारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शैलेंद्र पाटील, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सतीश कापङणी, शहर-1 विभागाचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, शहर-2 विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, ग्रामीण-2 विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण पहुरकर, सिल्लोड विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, कनिष्ठ विधी अधिकारी सुनील पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यापीठाच्या क्रीडांगणावर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, टेनिकॉइट, ब्रीज, कुस्ती, धावणे (100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 5000 मीटर), 4 बाय 100 मीटर रिले, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक व भाला फेक या क्रीडाप्रकारांसाठी तर क्रिकेटसाठी सिडको एन-2 येथील जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर निवड चाचणी झाली. निवड चाचणीसाठी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने महावितरणला सहकार्य केले.



