3-storey building collapses | नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली; जेसीबीनं हटवला जातोय मलबा

नवी मुंबई : बेलापूर सेक्टर 19 शहाबाज गावातील इंदिरा निवास मधील तीन मजली इमारत कोसळली आहे. ही इमारत 2013 मध्ये बांधण्यात आली होती. कोसळलेल्या इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स होते. पहाटे अचानक इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत इमारतीत राहणारी 40 लोक आणि 13 मुलं सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर, ढिगाऱ्याखालून दोघांना बाहेर काढण्यात आलं आहे. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप एक व्यक्ती बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे.
बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले मात्र तीन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्यात आलं असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे. प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बिल्डिंग कोसळली. पत्त्यासारखी बिल्डिंग जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळाली. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली. दुर्घटनेची बातमी मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.


