मराठवाड़ा

छत्रपती संभाजीनगरात बिबट्या परतला!

छत्रपती संभाजीनगर : मोबाईल सतत पाहण्याची अनेकांना सवय असते. याच धर्तीवर आता अनेकजण सतत सीसीटीव्ही पाहत आहेत. कारण शहरात बिबट्या परतला असून, तो मोकाट फिरत आहे. तो आपल्या परिसरात तर आला नाही ना? या भीतीपोटी बरेच जण हे फुटेज तपासत आहेत.

नऊ दिवसांनंतर शनिवारी पहाटे चिकलठाणा एमआयडीसीत बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. एनएचके कंपनीच्या कुंपणावर सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसला. काही वेळातच बिबट्या तेथील झुडपात पसार झाला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक परिसरात दाखल झाले. कंपनीच्या आवारात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. झाडाखाली तो काही वेळ दबा धरून असल्याचा खुणा आढळल्या आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील राहुलनगर येथील बनेवाडी परिसरात देखील बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली आहे.

नारेगाव परिसरात दहशत

नारेगाव परिसरातील एका बर्फाच्या कारखान्यातील अश्विनी फुंदे या मुलीने सोमवारी सकाळी बिबट्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून जाताना पाहिला. पण, बाजूच्या कारखान्यातील फुटेज तपासण्यात आले, त्यात काही दिसले नाही. ठसेही जुळत नसल्याचे पथकाने सांगितले.

संशयास्पद काही नाही : तौर

घाबरू नका, परंतु दक्षता ठेवा. फोन आला तेथे वनपाल अप्पासाहेब तागड, सर्पमित्र नितीन जाधव, नागरिक सुरेश मगरे यांच्यासह पाहणी केली. गस्त सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button