मराठवाड़ा

आंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर पडले, १५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : मृत मुलीचे नाव नुरेन अजीम सय्यद (रा. उस्मानपुरा) असे आहे. ही घटना शुक्रवारी (२९ डिसेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुरेनचे वडील मॅकॅनिक असून, त्यांच्या आंघोळीसाठी नुरेनच्या आईने गॅसवर गरम पाणी ठेवले होते. नुरेन खेळत असताना गॅसवरील गरम पाण्याचे पातेले तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीर भाजली. तिच्या आई-वडीलांनी तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता, सदर मुलीचा उपचारांदरम्यान शनिवारी (३० डिसेंबर) सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार आर. पिरंगे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button