क्रीडामुख्य बातमी

विनेश फोगटने कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडक

पॅरीस ऑलिम्पिकचा 11 वा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला. कुस्तीपटू विनेश फोगटने फायनलमध्ये धडक दिली आहे. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करून तिने पदक निश्चित केले आहे. मंगळवारी तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. आता विनेशचा फायनल सामना बुधवारी होणार आहे.

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळे विनेश फोगटने इतिहास रचला आहे. विनेश फोगटने क्वार्टर फायनल फेरीत उत्तम विजय मिळवला होता. तिने युक्रेनच्या ओस्काना लिवाचचा 7-5 असा पराभव केला. विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये विद्यमान चॅम्पियन जपानच्या सुसाई युईचा पराभव केला होता. विनेशने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेची सेमीफायनल गाठली होती. याआधी 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button