क्राईममहाराष्ट्र

18 वर्षांच्या तरुणाला चॉपरने सपासप वार करुन संपवलं

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यापाठोपाठ मुंबईतही गुन्हेगारी घटनांचे (Mumbai Crime) प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यातील कोयता गँगचे किस्से आतापर्यंत कानावर येत होते. मात्र, मुंबई उपनगरातील गोवंडी परिसरात अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

गोवंडी परिसरात पूर्ववैमन्यसातून एका 18 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या तरुणाचे नाव सईद पठाण असे होते. एका जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी सईदवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे चित्रण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण खाली निपचित पडलेल्या सईद पठाण याच्या डोक्यावर चॉपरने सपासप वार करताना दिसत आहे.

याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनी तलवार आणि चॉपरने वार करुन सईदची हत्या केली. व्हिडीओमध्ये सईद पठाण हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडलेला दिसत आहे. मात्र, तरीही त्याच्यावर हल्ला करणारा एक तरुण चॉपरने त्याच्या डोक्यात वार करताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावर आजुबाजूला लोकांची गर्दी दिसत आहे. काहीजण सईदला वाचवण्यासाठी पुढे येऊ पाहत होते. मात्र, हल्लेखोरांपैकी एकाने हातातला चॉपर हवेत फिरवून त्यांना लांबच राहण्याचा इशारा दिला. सईद पठाण पूर्णपणे मेल्याची खात्री पटल्यानंतर हल्लेखोर तिथून गेले. गोवंडीत भरदिवसा इतक्या निर्घृणपणे तरुणाची हत्या झाल्याने मुंबईत पोलिसांचा धाक उरलेला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button