मराठवाड़ा

84 दिव्यांगांनी सर केले सर्वोच्च कळसुबाई शिखर..

पैठण प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे एवरेस्ट समजले जाणारे सर्वोच्च कळसुबाई शिखर राज्यातील 84 दिव्यांगांनी यशस्वी सर करून नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दरवर्षी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात येते. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत कळसुबाई शिखराच्या माथ्यावरून करून अनोख्या पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा उपक्रम गेल्या बारा वर्षापासून सलग सुरू आहे. शिवुर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र करून हा अनोखा उपक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर ,पुणे, नाशिक ,बीड ,अकोला, वर्धा ,बुलढाणा, मुंबई, यवतमाळ ,अमरावती, परभणी ,सोलापूर ,धाराशिव ,सातारा जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, हिंगोली या जिल्ह्यातील दिव्यांग कळसुबाई शिखर पायथ्याच्या बारी गावात 31 डिसेंबर रोजी सकाळी एकत्र झाले. दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष शिखर चढायला सुरुवात केली. खाच खळगे, डोंगर कपारी,घनदाट जंगल, दगड धोंडे, काट्या कपाट्या ,लोखंडी शिड्या, निसरड्या वाटा या सर्व अडचणीला सामोरे जात व एकमेकांना आधार देत अवघ्या चार तासात ही सर्व दिव्यांग मंडळी कळसुबाई शिखर माथ्यावर अंधार पडण्यापूर्वीच पोहोचली.
रात्रीच्या अंधारात व कडाक्याच्या थंडीत या सर्व ८४ दिव्यांगांनी रात्रीचा मुक्काम कापडी तंबूत शिखर माथ्यावरच केला. एक जानेवारी रोजी भल्या पहाटे उठून शिखर माथ्यावरील सर्वोच्च कळसुबाई मंदिरापासून नवीन वर्षाच्या उगवत्या नवसुर्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. सकाळी नऊ वाजता शिखर उतरण्यास सुरुवात करण्यात आली आणि अवघ्या तीन तासात पायथ्याचे बारी गाव गाठले. या ठिकाणी छोटे खाणी कार्यक्रमात दिव्यांग क्षेत्रात सर्वोच्च कार्य करणाऱ्या 12 दिग्गज दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग ऊर्जा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण ऊर्जा मोहिमेचे नियोजन संस्थेचे सचिव कचरू चांभारे सर यांच्या नियोजना खाली यशस्वी पार पडले.
मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व दिव्यांगांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवाजी गाडे, कचरू चांभारे, सागर बोडके ,जगन्नाथ चौरे, जीवन टोपे, सुनील वानखेडे, उमेश खापरे, कल्याण घोलप, अंजली प्रधान, मच्छिंद्र थोरात, लक्ष्मण वाघे, अनिता जंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सहभागी दिव्यांग सदस्य

शिवाजी गाडे पैठण, कचरू चांभारे बीड, सागर बोडखे नाशिक, उमेश खापरे वर्धा, सुनील वानखडे बाळापूर अकोला, जगन्नाथ चौरे ठाणे, सतिश आळकुटे पुणे, लक्ष्मण वाघे सोलापूर, मनीराम मानेराव कारंजा वर्धा, राजेश पोटे निफाड नाशिक, रवींद्र भवाने अकोला, संदीप चव्हाण पुसद यवतमाळ, जीवन टोपे खेड पुणे, वैजनाथ देवाळकर बीड, दिगांबर कांबळे पुणे, हरिभाऊ हिंगवे कारंजा वर्धा, शंकर गाडगे कारंजा वर्धा, आलोक गाडे नाशिक, वेदांत कुशारे नाशिक, ईशान कुशारे नाशिक, दिपक गिराम सोलापूर, कल्याण घोलप बीड, सुभाष मुळीक फलटण, नम्रता चामलाटे अमरावती, चित्रकला जाधव पुणे, जयदीप चव्हाण बदलापूर मुंबई, बालाजी पौळ पालम परभणी, गजानन रोकडे अकोला, विजय पाटील भिवंडी, अमोल शिंदे परतुर, धर्मेंद्र सातव पुणे, जयश्री धायबर खेड, किरण धायबर खेड, संदीप राऊत वैजापूर, सागर इंगळे अकोला, कार्तिक सूर्यवंशी अकोला, रूपेश जाधव अकोला, खुशाल बोरसे पुणे, गणेश शिंदे छत्रपती संभाजीनगर, किशोर शेवाळे बुलढाणा, हरिदास पाचपोर अकोला, दीपक कदम औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली, स्वाती बाप्पा मगर धाराशिव, तुकाराम कदम धाराशिव मुंबई, रघुनाथ सातव पुणे, सुभाष दिवेकर दौंड पुणे, सौरभ मातेले जुन्नर पुणे, संजय केदारी जुन्नर पुणे, सविता केदारी जुन्नर पुणे, रुक्मिणी कोकरे मंगळवेढा, सविता सुरवसे मंगळवेढा, सिद्राया माळी मंगळवेढा, नितेश परदेशी पुणे, ज्ञानेश्वर शिंदे आंबेगाव पुणे, राजेंद्र आडागळे गेवराई बीड, नवनाथ बारबिंडे जिंतूर परभणी, सुरेश फाळके पातुर अकोला, विवेक चिंचोले अंबरनाथ, संध्या चिंचोले अंबरनाथ, संतोष कसबे गेवराई, ज्ञानेश्वर कुचमे पुणे, पुजा खंदाडे लातूर, रामु खाकरे फुलंब्री संभाजीनगर, वेदांत कुशारे, ईशान कुशारे नाशिक, प्रतिक्षा गाडे पैठण, सुप्रिया लोखंडे पुणे, सतीश आहेर पैठण, दिलीप गायकवाड पैठण, रामदास काळे पैठण, प्रशांत सोळंके अकोला, प्रतिम गाडे, निखिल नाईक सेलू वर्धा, गणेश निंबोकार, दिपक नरवडे पैठण

दिव्यांग ऊर्जा पुरस्कार

पांडुरंग भोर सिन्नर नाशिक, पोन्नालगर देवेंद्र सायन मुंबई, चत्रु पवार धुळे, नीता ढवान बारामती पुणे, बाळासाहेब नेरकर तेलारा अकोला, पोपट खोपडे भोर पुणे, विष्णू वैरागड हिंगोली, नवनाथ बरबिंडे जिंतूर परभणी, सुनील वानखेडे बाळापूर अकोला, सुभाष मुळीक फलटण सातारा, उमेश खापरे वर्धा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button