मराठवाड़ा

पैठण: पत्रकार कार्यालयात दर्पण दिन साजरा

पैठण प्रतिनिधी
पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला.
मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज म्हणजेच ६ जानेवारी रोजी सुरु केले. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या बस स्थानक चौकातील कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, मदन आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गौतम बनकर, नंदकुमार चव्हाण, रमेश शेळके, दादा गलांडे ,शिवाजी गाडे, सुरेश वायभट ,एकनाथ काळे, बाबा अडसूळ, बाळु आहेर सह सर्व पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button