मराठवाड़ा

श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल मध्ये आनंदनगरी व महिला पालक मेळावा

गंगापुर प्रतिनीधी
गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल येथे दिनांक 20 शनिवार रोजी विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान समजावं म्हणून गुंतवणूक करून नफा व तोटा कसा होतो हे समजण्यासाठी आंनदनगरी  तसेच महिला पालक मेळावा चे शाळेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त  करण्यात आले होते महिला पालकांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती मध्ये मोलाचा वाटा असतो फक्त तसा प्रतिसाद आपण द्यावा विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल थाटले यांध्ये चटकदार पाणीपुरी, मुंबई ची स्पेशल भेळ,’तेरी मेरी पावभाजी,स्वादिष्ट गुलाबजामून,दिल खुश दाबेली सेंटर,रॉयल दही पुरी सेंटर असे विविध स्टॉल मांडण्यात आले या स्टॉल ला पालकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला या स्टॉल च्या माध्यमातून हजारो रुपयांची उलाढाल झाली सर्व विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेले खाद्य पदार्थ संपले यामध्ये जागेवर गरम तयार करून दिलेला चहा व गरमा गरम भजे यावर जास्त गर्दी झाली होती या कार्यक्रमासाठी शाळेचे सचिव प्रमोद महाजन, समन्व्यक सविता खेत्रे, गणेश वाडेकर,वंदना चव्हाण,शीतल नरोडे,भाग्यश्री नरोडे, किरण राजपूत,मनीषा औटी,कोमल काकडे, रश्मी राजपूत, दीपिका वाघचौरे,वैशाली साबणे,प्रियंका घटे, दीपक हजारे,गजानन राऊत,विजय पोटे,जोयेब पिंजारी,आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button