मराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमी

शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह चौघांना आयशरची जोरदार धडक

तिघांचा दुर्दैवी अंत; चालक फरार

जालना : येथील मंठा (Mantha) शहरातून भीषण अपघाताची (Jalna Accident News) घटना समोर येत आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सह वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने (Eicher Truck) जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे. मंठा येथील देवी रोडवर ही घटना घडली आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंठा शहरातील देवी रोडवर शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सहा वर्षीय मुलगी, महिला आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान दुर्देवी अंत झाला आहे.

तिघांचा दुर्दैवी अंत, चालक फरार

सीमा चव्हाण (24), मारिया पठाण (6) आणि रूपला राठोड वय 65 वर्ष असे मृतांचे नावे आहेत. तर या घटनेत इशिका चव्हाण ही चार वर्षाची चिमुकली मुलगी देखील जखमी झाली आहे. या घटनेनेनंतर आयशर चालक फरार झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. भीषण अपघातात तीन निष्पाप लोकांचा बळी गेल्याने मंठा शहरासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button