महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

मनसे कार्यकर्त्यांनी फोडली मिटकरींची गाडी; जय मालोकरचा जीव गेला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अकोल्यातील मनसे सैनिक चांगलेच संतापले. अकोला शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसे सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसे सैनिकांची बाचाबाची झाली. यावेळी पूर्णतः तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. अमोल मिटकरी विरोधात मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्यानंतर मनसे सैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा केली. यानंतरच अकोल्यात राडा झाला आणि मनसे कार्यकर्ता जय मालोकार (Jay Malokar ) याचा जीव गेला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेली हीच टीका मनसेच्या जिव्हारी लागली. अकोला शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाचीही झाली.

अकोल्यात झालेल्या या राड्यानंतर पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. त्यामध्ये जय मालोकार याचाही समावेश होता.  अकोल्यात ज्यावेळी राडा झाला त्यावेळी जय मालोकारला अस्वस्थ वाटू लागलं. या प्रकरणातील इतर आरोपी फरार झाले पण जय मालोकारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची तपासणी केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं. पण उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.

मनसे आणि राष्ट्रवादीच्या या वादाची ठिणगी पडली ती राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यावेळी.. पुण्यातील पुरावरून राज ठाकरेंनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर दहा वर्षांपूर्वीच्या वक्तव्याचा दाखला देत खास ठाकरी शैलीत टोला लगावला होता. त्यावर सुपारीबहाद्दर म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंना अंगावर घेतलं होतं. मिटकरींच्या टीकेमुळं मनसैनिक संतापले. हिंमत असेल तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि 2 आमदार निवडून आणावेत असं आव्हान मनसे नेत्यांनी मिटकरींना दिलं.

मनसेनंही मिटकरींवर निशाणा साधलाय. हिंमत असेल तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि 2 आमदार निवडून आणावेत असं आव्हान गजानन काळेंनी मिटकरींना दिलंय. तर अजित पवारांमुळे मिटकरींना विधानपरिषदेची जागा मिळाली. त्यामुळे त्यांना बोलावं लागत असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलीय.

जयच्या कुटुंबियांची भेट घेणार

आपण लवकरच जय मालोकार याच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तर कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृत मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावं असं आवाहन यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button