
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्याने बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये असे म्हणून आरोपी विद्यार्थिनीला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता. माझ्यावर प्रेम केलं नाही तर आत्महत्या करेल, अशी धमकीही या तरुणाने या विद्यार्थिनीला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या गायत्री दाभाडे या तरुणीने हॉस्टेलमध्येच गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तू गायके याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


