महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

मी ढेकणांच्या नादी लागत नाही

पुणे : प्रतिनिधी
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शिवसैनिकांचा संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला.  यावेळी त्यांचे नाव न घेता त्यांना ढेकणाची उपमा दिली. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसेना उबाठामधील वाद रंगणार आहे. यावेळी पुणे शहराचा विकास करताना नदीचा प्रवाह भाजप बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तू राहूच शकत नाही, तुझा बंदोबस्त करण्यासाठी मी मैदानात उतरलो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ब-याच वर्षांनंतर मी पुण्यात तुमच्यासमोर येतोय. आज मला जाहीर सभा घ्यायची होती. आता लढाई मैदानात होणार आहे. हॉलमध्ये होणार नाही. मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. त्यानंतर माझ्या पायाशी कलिंगड ठेवले गेले. काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटाने चिरडले जाते. त्यानंतर ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस.

पुण्यात मुळा-मुठा नदी आहे. त्याबाबत व्यंकय्या नायडू म्हणाले होते, मुळा-मुठा हे काय नाव आहे. व्यंकय्या नाव ठेवायचे का, की मोदी नदी म्हणायचे का?. त्यांनी नद्यांची नावे बदलायला सांगितली. नावे तर बदलू शकत नाही. पण त्यांनी प्रवाह बदलला. पुण्यात नाईक बेट आहे. या नाईक बेटाचा दोन्ही बाजूंनी प्रवाह बंद केला.
खड्ड्यांचं पुणं झालंय, पण सगळीकडेच खड्डे झाले आहेत, मुंबईतही खड्डेच खड्डे झाले आहेत. आमचे नितीन गडकरी छातीठोकपणे सांगत होते की, मी असे रस्ते बनवेण की 200 वर्षे खड्डेच पडणार नाहीत. पण, अजूनही रस्ते होत नाहीत, कोकणातील मुंबई-गोवा महामार्ग अजूनही होत नाही. गणपती बाप्पा व चाकरमान्यांसाठी दरवर्षी रस्त्यावर खड्डे बघायला जाण्याची नाटकं होतात. जसं युगपुरुष असतं तसं खड्डापुरुष असा पुरस्कार द्या सगळ्यांना. टरबूज जाऊ द्या ओ, कुठंही खड्ड्यात घाला त्याला, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर हल्लाबोल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button