महाराष्ट्रमुख्य बातमी

खदानीच्या पाण्यात बुडून चौघांचा मृत्यु

नांदेड : सध्या पावसाळा असल्याने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाई धबधबा (Waterfall), नदी, ओढा आणि पाणी असलेल्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाते. मात्र, यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याशी खेळते, फोटो आणि सेल्फीच्या नादात दरी-खोऱ्यात उतरते, डोंगरांच्या कठड्यावर बसून शूट करते. त्यातून, अनेक जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. नांदेड (Nanded) शहराजवळील एका खदानी बुडून 4 मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. शहराजवळच्या झरी येथील खदानीत बुडून चार युवकाचा मृत्यु झाल्याची दु:खद घटना घडली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चारही तरुण 12 वीचे विद्यार्थी (Student) होते. हे सर्वच मित्र शहरातील देगलुर नाका भागातील रहिवासी होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहिम सुरू केली होती.

पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आज पाच मित्र फिरायला म्हणून झरी या ठिकाणी आले होते. त्यावेळी, फोटो काढण्यासाठी पाचजण खदानीत खाली उतरले. फोटो काढल्यानंतर पाच पैकी 4 जण पाण्यात उतरुन पाण्यात पोहोण्याचा, अंघोळ करण्याचा आनंद घेत होता. मात्र, खदानीतील पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही चारही मित्र खदानीत बुडाले. त्यांनंततर, त्यांच्यासोबत गेलेल्या तरुणाने ही माहिती नातेवाईकाना कळवली. त्यानंतर, नातेवाईक व परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलास व पोलीस यंत्रणांनीही घटनास्थळी धाव घेत खदानीत बुडालेल्या 4 मुलांचा शोध सुरू केली होती.

अग्निशमन दल आणि गोदावरी जीव रक्षक दलाच्या जवानानी दोन तास शोध घेऊन चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी खदानीजवळच टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनं नांदेड जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button