
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : जय भवानीनगरातील गल्ली नंबर दोनमध्ये धुडगूस घालणाऱ्या चौघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पकडले.
सौरभ हानुमंत आघाव (वय 25), आनंद पदमाकर खिलारे (वय 26), सागर विश्वराज दिवेकर (वय 26) आणि मनोज संजय पडुळ ऊर्फ लंगडा मन्या अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारीला जय भवानीनगर गल्ली नं. 2 मध्ये 20.30 वाजेच्या सुमारास नमूद ठिकाणावरुन फिर्यादी हे मेडीकल स्टोअर्स येथून मेडीकल घेऊन जात असताना आरोपींनी फिर्यादीची गाडी आडवून त्यांच्या तोडावर सिगारेटचा धुर सोडुन फिर्यादीकडील ‘किरपाण’ मागीतली. फिर्यादी यांनी विरोध केल्यामुळे वरील नमूद आरोपीतांनी फिर्यादीस हाताचापटाने मारहाण करुन व शिवीगाळ केली. फिर्यादी तेथुन घरी निघुन जाताना त्यांचा पाठलाग करुन त्यांच्या घरापर्यंत जावून तेथे हातात तलवारी घेऊन
बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी व त्यांच्या भावाला जखमी केले आहे. तसेच फिर्यादी यांच्या घरा समोरील पार्क केलेल्या मोटार सायकलची तोडफोड केली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला पकडले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाठोरे हे करीत आहेत. आरोपींना पकडण्याची कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप-आयुक्त नवनीत कॉवत, सहा. पोलीस आयुक्त रंणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे, विशेष पथकाचे पोउपनि झनकसिंग घुनावत, नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, गणेश वैराळकर, पोलीस अंमलदार अनिल थोरे,गणेश वाघ, संदीप वैद्य, नीलेश पाटेकर यांच्या पथकाने केली.


