
गंगापुर (अमीन पटेल)ःतिन्ही हंगामात शेतकरी पाणी घेऊन 100 टक्के ड्रीप वर शेती करू शकतो अशी योजना तालुक्यापासून ते मंत्रालयापर्यंत अशा विविध 132 बैठका घेऊन शेतकर्यांना कायमस्वरूपी बळकट स्रोतातून शाश्वत पाणी,आणि वीज शेतकर्यांना देण्याची योजना मंजूर करून या योजनेचे दि.11 जानेवारीला लासुर आरापूर येथे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती अमादर प्रशांत बंब यांनी गवळी धानोरा,दिगी येथे बोलताना दिली.यावेळी व्यासपीठावर भरत पाटणी,माजी सभापती नंदकुमार गांधीले,सभापती भाऊसाहेब पदार,माजी जलसंपदा विभागाचे अधिकारी डी.कासले यांची उपस्थिती होती. दरम्यान आमदार बंब यांनी जलसंपदा विभागाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करून 30 हजार एकर शेतीला गंगापूर तालुक्यातील 40 गावतील लाभधारक शेतकर्याना तिन्ही हंगामात शेती क्षेत्रातुन कायमस्वरूपी ड्रीपद्वारे शेतीतुन भरीव उत्पन्न मिळुन शेतकरी सुजलाल सुफलाम होऊन आर्थिकदृष्ट्या सदन होईल अशी योजना मंजूर करून घेतली आहे.पुढील 24 महिन्यात या योजनेचे काम पूर्ण होणार असल्याची माहितीही देऊन त्यांनी त्या कार्यक्रमास नागरिक शेतकर्यांना आवाहन केले.
फडणवीस यांच्या हस्ते गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ
पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा योजना गेल्या 30 ते 40 वर्षांपूर्वीच झाल्या यामुळे त्या भागातील शेतकरी हा सदन झालेला आहे.परंतु मराठवाड्यातील राजकीय उदासीनतेमुळे अशा योजना मराठवाड्यात फार तुरळक झाल्या.मराठवाड्यातील शेतकर्यांची दयनीय अवस्था बघून 2009 साली शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे ध्येय ठेवून राजकारणात प्रवेश करणार्या आमदार प्रशांत बंब यांनी न थांबता न थकता अनेक अडथळ्यांवर मात करत जायकवाडीचे पाणी शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम केले त्याचाच परिपाक म्हणजे येत्या 11 जानेवारी 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गंगापूर तालुक्यातील तीस हजार एकर शेती सिंचनाखाली येणार्या गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
30 हजार एकर शेती सिंचनाखाली येणार
गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी प्रचंड अभ्यास व बुद्धी कौशल्यने प्रचंड विरोध असतानाही जायकवाडी धरणात पाणी आणले.मराठवाडा वॉटर ग्रीड असो की दुष्काळाचा प्रश्न बंब अत्यंत पोटतिडकीने बोलतात.जायकवाडीतून गंगापूर तालुक्याला पाणी नेत त्यांनी दोन तीन दशकांचा पाण्याचा प्रश्न संपविला.आता हजारो हेक्टर शेती या पाण्यामुळे बागायती होणार आहे.11 जानेवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गंगापूर ब्रम्हगव्हाण जल सिंचन योजनेचा शुभारंभ करुण तालुक्यातील तीस हजार एकर शेती सिंचनाखाली येणार आहे.



