
गंगापुर प्रतिनीधी
शहरातील राजीव गांधी चौक येथे सुसज्ज अशा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये जय श्री राम व्यायाम शाळा फिटनेस क्लबचे उद्घाटन मंगळवार दि.०५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मा.नगरअध्यक्ष संजय जाधव,पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संतोष अंबिलवादे,मारुती खैरे,सुरेश नेमाडे,रामेश्वर नावंदर,नईम मन्सुरी,अमोल जगताप,योगेश पाटील,राकेश कळसकर,ज्ञानेश्वर यादव,सोपान देशमुख,रावसाहेब तोगे,राहुल वानखेडे,गजानन पाहुणे पाटील,सुरेश बाहुले,ज्ञानेश्वर साबणे,अख्तर सय्यद,राजेंद्र मोरे,भारत जैस्वाल,मंगेश देशमुख,बाळा राजपूत,अशोक खाजेकर,गुलाम शहा,हनिफ बागवान,दिनेश गायकवाड,मुकूंद जोशी,राजेश छाजेड,कलीम शेख कटलेरी, प्रविण फुलारे,प्रकाश गरड,मयूर जेऊघाले,संघरत्न घोडके,नितीन लोकरे,सुनील जाधव सह इत्यादींची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा.नगरसेवक सुरेश नेमाडे,राजू नेमाडे,मनोज नेमाडे,जीम ट्रेनर सोनू नेमाडे,दीपक नेमाडे यांनी परिश्रम घेतले.
ज्या समाजात शाळा आणि व्यायामशाळा या दोन शाळा चांगल्या असतील तर तो समाज मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्टया तंदुरुस्त राहतो.धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे व्यायाम केल्यामुळे आरोग्य चांगले व निरोगी राहते,
शरीराची ताकद वाढते,तसेच वजन कमी करण्यासाठी, मेटॅबॉलिझम वाढवण,बीपी शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी असे अनेक वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी व्यायाम करणं हे गरजेचं आहे.
- सोनू नेमाडे : जीम ट्रेनर



