क्राईम

सांगलीत पुन्हा गोळीबार; शेतात एकाची हत्या

सांगली : सांगलीतील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे पैशांच्या देवाण घेवाणीतून गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडलीय. पांडुरंग शिदें असं मयताचं नाव आहे. पांडुरंग शिदें हे शेतकरी असून त्यांचा काही जणांसोबत गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद सुरू होता. पांडुरंग शिदें हे कासेगाव येथील त्यांच्या शेतामध्ये सकाळी गेले होते. त्यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ह्ल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पलायन केले. अतिरक्तस्त्रावामुळे पांडुरंग शिद यांचा जागीच मृत्यू झाला.

पांडुरंग शिंदे यांची गोळ्या घालून खून झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालं नसले तरी पैशांच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची चर्चा आहे. कासेगावपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पांडुरंग शिंदे यांची शेती आहे. निर्मनुष्य या ठिकाणी हा खून झाल्याने कोणीही प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे बोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथक कासेगावमध्येच तळ ठोकून आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button