महाराष्ट्र

कळसुबाई शिखरावर एका दिव्यांगाची भटकंती

मी दिनांक ३०/१२/२०२३ रोजी भिवंडी येथुन रात्री १० वाजता निघालो. भिवंडी ते कल्याण, कल्याण ते कसारा व कसारा ते बारी असा प्रवास करत सकाळी ९.०० वाजता बारी गावात आलो . येताच मला कळसूबाई शिखर पाहुन  हे शिखर चढायचे आहे ते चढले जाईल की नाही अशी शंका आली. पुढे बारी गावात आलो तिथे प्रथम शिवाजी गाडे सर भेटले .माझी ही प्रथमच वेळ होती .सरांनी सांगितले त्याप्रमाणे बारी येथील मारुती मंदिर येथे थांबलो . तिथे अगोदर काही दिव्यांग बंधु भगिनीं उपस्थित होते . त्यांच्या बरोबर परिचय करून ११.०० वाजता तिथुन पुढे जाण्यासाठी निघालो व माची कळसूबाई मंदिर येथे थांबलो.तिथे अजुन बरेच दिव्यांग बंधु भेटले. काही जण अजूनही मागे होते .तिथे फोटो सेशन करून दुपारी २.०० वाजता कळसूबाई शिखर चढण्यासाठी सुरुवात केली. चढतांना सहारासाठी काठी घेऊन महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे हे कळसूबाई शिखर ते चढताना अतिशय कठीण रस्ता, बिकट वाट, बारीक पाऊल वाट पार करत रस्ता पार करत होतो .मी शिखर चढताना एक निश्चय केला की जास्त लांब न बघता थोडी थोडी वाट चालायची व पुढे बघायची. मधे मधे ठिक ठिकाणी लिंबु सरबत घेतले त्यामुळे  थकवा काही जाणवलाच नाही जणू काही शरीरात नविन उर्जा संचरल्याचे जाणवत होते.तो माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. अतिशय कठीण मोहीमेचे नियोजन शिवाजी गाडे सर व चांभारे सर यांनी गेल्या १२ वर्षा पासून करत आहे. अतिशय बिकट वाट पार करत बर्याच ठिकाणी फोटो सेशन करून, पुढे ४/५ ठिकाणी अवघड शिडी देखील पार करुन सांयकाळी ५.०० वाजता सर्व दिव्यांग बंधु भगिनींनी कळसूबाई शिखर गाठले . तिथे सर्वांची रात्रीच्या मुक्कामासाठी टेंन्ट मध्ये व्यवस्था करण्यात आली होती. पाठीवर बरीच भरलेली बॅग होती ती टेंन्ट मध्ये ठेवून मग चहा घेऊन लगेच सरत्या वर्षाचा शेवटचा सुर्यास्त बघण्यासाठी लगेच कळसूआई चे मंदिरावर सिडी चढून गेलो. तिथे प्रथम कळसूआई चे दर्शन घेतले आणि त्यानंतर सुर्यास्त बघण्यासाठी बरीच मंडळी होती . त्यानंतर परत सिडी उतरुन आपापल्या ठिकाणी परत आलो . शिखर चढताना आगोदर थंडी काही जाणवली नाही पण रात्री ८.०० नंतर भरपूर प्रमाणात थंडी होती. रात्री सर्वानी जेवण करून आपापल्या ठिकाणी गेले तिथे काही दिव्यांग बंधु नी करमणूक म्हणून अतिशय सुंदर गाणे म्हटले .कला ही जीवन जीवन ही एक कला.  मग अतिशय जिद्दीने सर्व दिव्यांग बंधु भगिनीं कळसूबाई शिखर चढुन गेलो म्हणून म्हणावेसे वाटते की युं ही पंखो से उडान नहीं होती होसलो से उडान होती है . रात्री झोपुन सकाळी पहाटे ५.०० वाजेपासूनच उठून परत कळसूआईचे मंदिरावर सिडी चढण्यासाठी सर्व दिव्यांग बंधु भगिनींनी धावपळ केली .६.०० वाजेपर्यंत सर्व दिव्यांग बंधु भगिनींनी शिखर गाठले . महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून बरीच मंडळी नविन वर्षाच्या उगवत्या सूर्याची वाट पाहत बसलो होतो. एकदम थंडी च्या कडाक्यात सुर्योदय केव्हा होईल याची उत्सुकता होती. बघता बघता वेळ झाली आणि एकदम नविन वर्षाच्या उगवत्या सूर्याचे दर्शन झाले. तो क्षण फारच अप्रतिम होता. विसरता न येण्यासारखा  सर्व जण जय भवानी जय शिवाजी .हर हर महादेव  आशा गर्जना करीत होते. आम्ही सर्व दिव्यांग बंधु भगिनीं व शिवाजी गाडे सर  चांभारेसर एकत्र येऊन फोटो सेशन केले . त्या नंतर प्रत्येक दिव्यांग बंधु भगिनींना हार घालून नवं वर्षाचे स्वागत केले फारच अप्रतिम क्षण होता. त्यानंतर ९.०० वाजता कळसूबाई शिखर उतरण्यासाठी सुरुवात केली. उतरतांना राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधु भगिनींनी सर्व दिव्यांग बंधु भगिनींना कौतुकाची थाप दिली की सलाम तुमच्या हिमतीला . वेळोवेळी मदत देखील करत होते खासकरून सिडी उतरताना प्रथम दिव्यांग बंधु भगिनींना पुढे जाण्यासाठी रस्ता सिडी मोकळी करून दिली . धन्यवाद त्या सर्व बंधु भगिनींना ११.३० वाजता परत ८४ दिव्यांग बंधु भगिनीं माची मंदिर येथे पोहोचलो. तिथे सरांच्या उपस्थितीत जेवण करून पुढे बारी गावातील मारुतीच्या मंदिरात एकत्र आलो .तिथे  शिवाजी गाडे सर‌‌‌ ,कचरू चांभारेसर यांच्या उपस्थितीत १२ जणांना केलेल्या विविध कार्याबद्दल दिव्यांग ऊर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यात प्रत्येकाने आपल्या केलेल्या कार्याचा परिचय दिला. त्यात तामिळनाडू येथील दिव्यांग बंधु यांनी मुंबई येथे दहीहंडी फोडण्यासाठी सुरू केलेले दिव्यांग युनिट तसेच लिम्का वर्ल्ड बुक मध्ये नाव नोंदणी झालेले व त्यांनी घोड्यावर बसून केलेली किल्ल्यांची केलेली  भटकंती व आता उंटावर बसून परत किल्ले पाहण्याची इच्छा .हे विशेष तसेच इतरांचे कार्य देखिल उल्लेखनीय होते. त्यानंतर सर्व दिव्यांग बंधु भगिनींना मोहीम यशस्वी केली त्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . त्यानंतर फोटो सेशन करून मग  प्रत्येक दिव्यांग बंधु भगिनीं परतीच्या प्रवासाला लागलो. सहवास होता काही तासांचा पण आयुष्य भर ती आठवण विसरू शकणार नाही .
म्हणून जाता जाता हेच म्हणावेसे वाटते की आयुष्याचे calculation खुप वेळा केले पण सुख आणि दुःख ह्यांचे account कधी जमलेच नाही. शेवटी हिशोब झाला तेव्हा समजले की आठवण सोडून काहीच balance शिल्लक रहात नाही. माझे हे पहिलेच वर्षे होते व जळगाव जिल्ह्यातून मी एकमेव या मोहिमेत सहभागी झालो होतो . शेवटी शिवाजी गाडे सर‌‌‌ व कचरू चांभारेसर तसेच सर्व दिव्यांग बंधु भगिनींचे  पुन्हा एकदा आभार मानतो. फार अप्रतिम आठवण राहील   .
– विजय धनराज पाटील
सहायक शिक्षक भिवंडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button