मराठवाड़ा

मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गंगापुर प्रतिनीधी
शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतात ठिबक सिंचनातून पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना आमदार प्रशांत बंब यांनी मंजूर करून आणलेली आहे.गंगापूर सिंचन उपसा प्रकल्पाला लागणारी वीज उपलब्ध होण्यासाठी सोलार प्रकल्प मंजूर करून देणार आहोत. मराठवाड्याची दुष्काळी ओळख आता मिटली पाहिजे म्हणून मराठवाड्यासाठी आम्ही जल आराखडे तयार करून अनेक प्रकल्प मंजूर केले व गोदावरीच्या खोर्‍यात पाणी आणण्याचे काम केले.मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही.मराठवाड्याचे पळवलेले हक्काचे पाणी परत मराठवाड्याला कृष्ण खोऱ्यातून आणून देण्याचे काम आपल्या सरकारने केले.आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नाने मंजूर गंगापूर उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन व कामाचा शुभारंभ प्रसंगी केले.या योजनेमुळे गंगापूर तालुक्यातील ४० गावांमधील ३० हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना यामुळे फायदा होईल.असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलें.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजचा गंगापूरचा  कार्यक्रम ‘जय किसान’ चा नारा देणारा आहे. गंगापूर मध्ये गंगा नाव आहे परंतु गाव तहानलेले होते.येथे पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता.३० जून २०२३ ला आलो तेव्हा जलजीवन मिशन उद्घाटन केले तेव्हा ‘गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीची प्रत’ आणली होती व सांगितले होते,जानेवारी मध्ये कामाच्या भूमीपूजनाला मी पुन्हा येईल असे आश्वासन दिले होते.येत्या दीड वर्षात आपल्या येथे पाणी पोहचेल.मराठवाड्यासाठी रु. ३१,७५१ कोटी रुपयांच्या विविध योजना मंजूर केल्यामुळे ४ लाख ६९ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.गंगापूर मतदारसंघात जलयुक्त शिवार योजनेचे प्रभावी काम प्रशांत बंब यांनी केल्यामुळेच मतदारसंघ दुष्काळमुक्त होवू शकला.नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त शेतीचे मोठे काम आपल्याला करायचे आहे.आमदार प्रशांत बंब म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान! प्रशांत बंब यांनी कल्पकता वापरून जे प्रकल्प मतदारसंघामध्ये तितके प्रकल्प इतर कोणत्याच आमदारांनी केले नाहीत.या कार्यक्रमामध्ये कामगार कल्याण संच, महिला आरोग्य संच, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी कार्ड, उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी यांनी कार्ड तसेच खेळाडूंना क्रिडा साहित्य चे वाटप करण्यात आले.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड,कॅबिनेट मंत्री अतुल सावे,आमदार हरिभाऊ बागडे नाना,पालकमंत्री संदीपान भुमरे,आमदार प्रशांत बंब,जलसंपदा सचिव दिपक जी कपूर,जलसंपदा मुख्य अभियंता विजयजी घोगरे,भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीषजी बोराळकर,संजय खांबायते,सुहास शिरसाठ,यांच्यासह मतदारसंघातील हजारो शेतकरी,भगिनी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button