मराठवाड़ा

गंगापूर शिवसैनिकांच्या वतीने नार्वेकर यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ शोक व्यक्त

 

गंगापुर प्रतिनीधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य सोळा आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ गंगापूर शिवसैनिकांच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकूश सुबं, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष कानडे, शहरप्रमूख भाग्येश गंगवाल आदी उपस्थित होते . यावेळी तालुक्यांतील शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकूश सूब यांनी म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी हुकूमशाही पद्धतीनें व घटना बाह्य निर्णय दिला आहे. नार्वेकरांच्या निर्णयाचा मी गंगापूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने निषेध व्यक्त करतो, व गंगापूर तालुक्यातील मींधे गटाचा कुठलाही कार्यकर्ता दिसला की त्यंाना आपण गद्दार म्हणून डिवचले पाहिजे व त्यांना पक्ष सोबत केलेला गद्दारी वारंवार लक्षात आणून दिली पाहिजे, शहरातच नव्हे तर प्रत्येक गावात शिवसैनिकांनी त्यांच्यासोबत असेच करायला पाहिजे.आमदार जरी आला तरी त्याला गद्दार म्हणूनच बोलल पाहिजे, आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना या गद्दारांना त्यांची जागा दाखवेलच असे त्यांनी सांगितले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, काल राहुल नार्वेकर यांनी घटनाबाह्य निर्णय दिला मात्र एका दृष्टिकोनातून तो निर्णय शिवसेनेच्या हिताचा ठरत आहे कारण आज फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर या सारख्या समाजमाध्यमांवरील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलचीच सहानुभूतीची पोस्ट पाहायला मिळत आहे याचा अर्थ जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे, या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील सामान्य नागरिक ही निषेध व्यक्त करत आहेत कारणहा निर्णय हुकूमशाही पद्धतीचा आहे, पण हे काही जास्त दिवस टिकणार नाही कारण हे सर्व पैशाच्या व सत्तेच्या जीवावर चालू आहे व हे फार काळ टिकणार नाही . आगामी विधानसभा निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठ्या संख्येने आमदार निवडून येतील व पुन्हा सरकार शिवसेनेचं येईल असा विश्‍वास कृष्णा पाटील डोणगावकर यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे म्हणाले की, राहुल नार्वेकर हे स्वत: चार पक्ष बदलून भाजपमध्ये गेले व विधानसभेचे अध्यक्ष झालेअ. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा नव्हती की ते आपल्या बाजूने निकाल देतील पण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हे देखील अवमान केलेला आहे. आपण शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खबिरपणे उभे राहिले पाहिजे . सध्याचे जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात हुकूमशाही व हिटलर पद्धतीने चालू आहे,1997 जेव्हा मी गंगापूर पंचायत समिती चा उपसभापती झालो तेव्हां एकनाथ शिंदे हे ठाण्याचे साधे नगरसेवक पन नव्हते. यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंकुश सुंब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शिवसेना गंगापूर वैजापूर तालुकाप्रमुख सुभाष कानडे, शिवसेना शहरप्रमुख भागेश गंगवाल, माजी नगरसेवक कैलास साबणे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नारायण बाराहाते, माजी पंचायत समिती उपसभापती पोपट गाडेकर,माजी पंचायत समिती चंद्रकांत जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भानदास पवार,विभागप्रमुख कारभारी दुबिले,विभागप्रमुख बाळासाहेब शेळके, युवासेना सरचिटणीस रावसाहेब टेके, राजेंद्र गावंडे, सुरेंद्र सूर्यवंशी, एन डी दारुंटे, भिमराज ठोकळ, बाबासाहेब कोतकर,अप्पा म्हस्के, चांगदेव जगताप, नागेश चौधरी, बाबासाहेब फटांगडे, दत्ता जाधव, आयुब पटेल, योगेश आवारे, महेश सावंत, सुरेश पतपुरे, गोविन्द वल्ले, प्रविण काळे, यांच्या सह गंगापूर तालुक्यातील व शहरांतील शिवसैनिक आज गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालय येथे मिधे गटाचे अपात्र आमदार च्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात नाही राहू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घटनाबाह्य चुकीच्या निर्णयाच्या विरोधात व निषेधार्थ गंगापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला यावेळी गंगापूर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button