देश -विदेशमुख्य बातमी

नवीन संसद आवारात घुसले पावसाचे पाणी; छताला पण लागली गळती

दिल्लीत मुसळधार पावसाने कहर केला आहे. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. तर नुकतेच देशाच्या शिरपेचात भर घातलेल्या नवीन संसद भवनाच्या आवारातही पाणी घुसले आहे. संसदेच्या मकरद्वाराजवळ पाणी साचले आहे. संसदेत पाणी भरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या प्रकारावर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. आता काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे.

दिल्लीत काल 31 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पाऊस झाला. काल रात्रभर पाऊस सुरुच होता. नवीन संसद भवनाच्या आवारातही पावसाने मोर्चा वळवला. या भागात पाणी साचले. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राममध्ये अनेक सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचले. मेट्रो स्टेशनबाहेर पाणी वाढल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

छताला पण लागली हो गळती

दिल्लीत झालेल्या पावसाने संसदेच्या आवारातच पाणी घुसले असे नाही तर नवीन इमारतीचे छतही गळत असल्याचे समोर आले आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर येथील काँग्रेसचे लोकसभेचे खासदार मणिकम टॅगोर यांनी याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहेर. त्यात नवीन संसद इमारतीच्या लॉबीमध्ये गळती लागल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत बुधवारी झालेल्या तुफान पावसामुळे 22 वर्षांची एक महिला आणि तिचा मुलगा नाल्यात पडला. या दोघांचा या घटनेत बुडून मृत्यू झाला. तर इतर घटनात दोघे जखमी झाले आहेत. रस्ते जलमय झाल्याने अनेक भागात नागरिकांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागला. तर विमान सेवा आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button