
गंगापुर प्रतिनीधी
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या वाढदिवसानिमित्त ”गीताबन कला महोत्सव” स्पर्धेचे आयोजन दि. १८ ते १९ जानेवारी रोजी करण्यात आले होते. यात गंगापूर खुलताबाद तालुक्यातील ८७३ विद्यार्थ्यांनी वयक्तिक गीत गायन, समहू गीत गायन, वयक्तिक नृत्य समूह नृत्य या कला प्रकारात सहभाग नोंदला. त्यात विजय विद्यार्थ्यांना रोख हजारांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र आयोजकांचे वतीने देण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार बंब यांचे वडील डॉ. बन्सीलाल बंब व माता कांचन बंब यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत प्राथमिक गट इयत्ता ५वी ते ७वी, माध्यमिक गट व विद्यालय गट इयत्ता ८वी ते १२ वीती शिकणाऱ्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विध्यार्थ्यांसाठी गीताबन कला महोत्सव गीत गायन व नृत्य स्पर्धा ग्राम पंचायत सरपंच मीनाताई संजय पांडव यांनी आयोजित केली होती.
परीक्षक विशाल गायकवाड व जयेश निरफल यांच्या दोन दिवसीय परीक्षणांती विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख अनुक्रमे पाच हजार ३५५, तीन हजार ३३०, दोन हजार २२३ तसेच उत्तेजनार्थ एक हजार ५३ रुपयांची अशी ४० पारितोषिके, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.
आमदार प्रशांत बंब यांच्या वाढदिवसानिमित्त गीताबन कला महोत्सव आयोनाची ही पहिलीच वेळ असून शिक्षकांनी व विध्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे हजारो विध्यार्थी सहभागी होऊ शकले व ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सरपंच मीनाताई पांडव यांनी आभार आणले.
—————————— —————————— ———
गीताबन कला महोत्सवात विजयी झालेले विद्यार्थी :-
नृत्य स्पर्धा प्राथमिक वर्ग ५ वी ते ७ वी :
प्रथम प्रिया सागर रोकडे, जिल्हा परिषद शाळा आगाठण, द्वितीय गार्गी नरेंद्र तांबट जिल्हा परिषद शाळा भिसेवाडी, तृतीय तमन्ना इंगोले बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल रांजणगाव शेणपुंजी, उत्तेजनार्थ राणी शेजुळ शिवाना इंटरनॅशनल स्कुल लासुर, संजीवनी वानखेडे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल रांजणगाव,नृत्य स्पर्धा माध्यमिक वर्ग ८ वी ते १२ वी :
प्रथम साक्षी कांचनदास कीर्तिकर सीबीसी विद्यालय द्वितीय नंदू सरोदे, जिल्हा परिषद शाळा लासुर स्टेशन तृतीय अमृता अशोक निघोटे, उत्तेजनार्थ जानवी विजय मोकळ, दिव्या सोमीनाथ गोरे नूतन विद्यालय माळीवाडगाव.
समूह नृत्य स्पर्धा माध्यमिक वर्ग ८ वी ते १२ वी :
प्रथम जिल्हा परिषद प्रशाला तुर्काबाद ,द्वितीय जिल्हा परिषद प्रशाला लासुर स्टेशन, तृतीय जिल्हा परिषद प्रशाला गाजगाव, उत्तेजनार्थ श्री गणेश विद्यालय लासुर स्टेशन, श्री स्वामी समर्थ विद्यालय स्टेशन.
वयक्तिक गीत स्पर्धा प्राथमिक वर्ग ५ वी ते ७ वी :
प्रथम स्वरा भागवत तनवाणी इंग्लिश स्कुल, द्वितीय हर्षद सुनील जाधव चाटे इंग्लिश स्कूल लासुर, तृतीय प्राजक्ता अशोक गायकवाड जिल्हा परिषद शाळा शिरेगाव, उत्तेजनार्थ संगपाल, दांडगे सिद्धार्थ जाधव बौध्दिष्ट इंटरनॅशनल स्कुल शेणपुंजी रांजणगाव.
सुमह गीत स्पर्धा प्राथमिक वर्ग ५वी ते ७ वी :
प्रथम डीसीए स्कुल खोजेवाडी, द्वितीय छत्रपती प्रेपरेटिव्ह हायस्कूल खोजेवाडी तृतीय इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ चाटे पब्लिक स्कूल लासुर स्टेशन, जिल्हा परिषद शाळा लासुर स्टेशन.
वयक्तिक गीत स्पर्धा प्राथमिक वर्ग ८ वी ते १२ वी :
प्रथम कोमल कुऱ्हाडे लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालय रांजणगाव पोळ, द्वितीय समीक्षा संजय गायकवाड जिल्हा परिषद प्रशाला लासुर स्टेशन, तृतीय आकाश गायकवाड न्यू हायस्कूल लासुर स्टेशन उत्तेजनार्थ वाघमोडे जिल्हा परिषद प्रशाला गवळीशिवरा श्रीहरी सोपान सातपुते डीसीए स्कूल खोजेवाडी.
समूह गीत स्पर्धा प्राथमिक वर्ग ८ वी ते १२ वी :
प्रथम डीसीएस स्कूल खोजेवाडी, द्वितीय जिल्हा परिषद प्रशाला तुर्काबाद तृतीय देवगिरी ग्लोबल अकॅडमी गंगापूर उत्तेजनार्थ जिल्हा परिषद प्रशाला गवळीशिवरा, जिल्हा परिषद प्रशाला लासुर स्टेशन.
समूह नृत्य स्पर्धा प्राथमिक वर्ग ५ वी ते ७ वी :
प्रथम जिल्हा परिषद प्रशाला भिसे वाडी स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल असेगाव तृतीय जिल्हा परिषद प्रशाला टाकळी उत्तेजनार्थ जिल्हा परिषद प्रशाला माळीवाडगाव जिल्हा परिषद प्रशाला गाजगाव.



