पैठण प्रतिनिधी (शिवाजी गाडे) : तालुक्यातील आपेगाव जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील कापसे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता ज्ञानेश्वर कापसे हे एकादशी निमित्त दर्शनासाठी मोटरसायकल वरून नाथ मंदिराकडे जात होते.
खंडोबा मंदिराजवळील लावलेल्या बॅरिकेट्स वर ड्युटीवर असलेल्या घुनावत या पोलीस कर्मचार्यांने ज्ञानेश्वर कापसे यांची मोटरसायकल आत मध्येन घेऊन न जाण्याबद्दल अडवले.
मोटर सायकल अडवल्याबद्दल कापसे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाची नंतर पैठण पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर कापसे यांच्या विरोधात कलम शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.


