मराठवाड़ा

राम मंदिर उभारणी व प्राण प्रतिष्ठापनेचा पैठणमध्ये जल्लोष

पैठण,प्रतिनिधीः आयोध्या मध्ये राम मंदिर उभारणी आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरू असताना पैठण शहरात शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.राम जन्मभूमी आयोध्या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त पैठण शहरात शिवसेनेच्या वतीने रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये भव्य शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.श्री रेणुका देवी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे यांच्या मुख्य नियोजनाखाली गेल्या आठ दिवसापासून या भव्य शोभायात्रा मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली होती.आज सकाळी 11 वाजता खंडोबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरातील मुख्य रस्त्यावर भव्य विविध स्वागत कमानी भगवे झेंडे आणि पारंपारिक धार्मिक वेशभूषेतील रामभक्तांनी या मिरवणुकीत सहभाग घेतलेला दिसून आला.मिरवणूक मध्ये भव्य श्रीरामाच्या मूर्तीची रथामधून मिरवणूक काढण्यात आली. राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाच्या वेशभूषेमध्ये जिवंत देखावे सादर करण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पैठण शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पैठण व्यापारी संघ, सराफा असोसिएशन, श्रीराम फ्रेंड्स ग्रुप व शालिवाहन पतसंस्थेतर्फे फराळ आणि पाण्याची सोय मिरवणुकीत करण्यात आली होती.या भव्य शोभायात्रेत राज्य दूध संघाचे सदस्य नंदू अण्णा काळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी, नगरपालिकेचे माजी गटनेते तुषार पाटील, शहादेव लोहारे, बाळू माने, दादा बारे,शिवराज पारिक, गणेश मडके, नामदेव खरात, शेखर शिंदे, विलास पहाडे, चेअरमन किशोर शेठ चौव्हाण, रमेश पवार, माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, रघुनाथ इच्छैया, कृष्णा मापारी, सोमनाथ परळकर ,संतोष सव्वाशे, जालिंदर अडसूळ, जनार्दन मिटकर, राज मानधने, डिडी जाधव यांच्या सह हजारो राम भक्त व पैठणकर महिला पुरुष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button