
गंगापुर प्रतिनीधी
लासुर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणत अतिक्रमण करण्यात आले असून मुळ स्मारकाची जागा हि कमी दिसत आहे त्यामुळे स्मारकाच्या सुशोभीकरनाच्या कामात नक्कीच अडथळा निर्माण होतोय ग्रामपंचायत च्या रेकॉर्ड नुसार १०० × १२० अशी आहे पण सद्य स्थिती मधे ही जागा कमी भरत आहे ह्या झालेल्या अतिक्रमणामुळे समस्त शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत ४ दिवसात हे झालेलं अतिक्रमण हटवून रेकॉर्ड वरील सर्व जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी सावंगी ग्रुप ग्राम ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नसता समस्त शिवप्रेमींच्या वतीने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल यावेळी नितीन कांजुणे,अमोल शिरसाठ, मनोज सुराशे,विजय भाले,अजय साखळे, अशोक खिल्लारे, मोहसीन बागवान, संदीप आमराव,गणेश आघाडे, विजय जगताप,आदेश रणयेवले, प्रतीक खंडेलवाल, मयुर शिरसाठ, विनोद शिरसाठ, आकाश भगुरे, सचिन डिके,अमोल काकडे, नदीम शेख आदी उपस्थित होते..



