क्राईमदेश -विदेशमुख्य बातमी

ISIS मॉड्यूलशी संबंध असलेला वाँटेड दहशतवादी रिझवान अटक

NIA ने ठेवलं होतं 3 लाखांचं बक्षीस

दिल्ली पोलिसांना इसिसच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्यात मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी इसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक केली आहे. रिझवान हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वाँटेड यादीत होता. रिझवानवरती तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. रिझवान हा पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित होता. आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रिझवानच्या डोक्यावर तीन लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते.

पुणे आयएसआयएस मॉड्यूलमध्ये मुख्य भूमिकेसाठी रिझवानवर अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग तपासला जात आहे.

आज(शुक्रवारी) पहाटे दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून रिझवानला शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती आहे. UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाज याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ ​​डायपरवाला अद्याप फरार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button