
पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यातच पालघरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पालघर (Palghar) जिल्हा निर्मितीला तब्बल दहा वर्ष उलटले आहेत, मात्र अजूनही तिथे मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. पालघरमधील एका पाड्याला स्मशानभूमी (Cemetery) नसल्याने सरणावर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार (Funeral) करण्याची वेळ नागरिकांना आली आहे. माणसाने वेदना सोसाव्या तरी किती? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
पालघरमधील पाड्याला स्मशानभूमी नसल्याने सरणावर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. डहाणूच्या सोनाळे खुबरोडपाडा येथील धक्कादायक घटना आहे. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या 56 वर्षीय जयराम झिरवा यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. यावेळी नातेवाईकांना प्लास्टिक खाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे दिसून आले आहे. अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांसह गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. महसुली गावाची असलेली स्मशानभूमी पाड्यापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे मुसळधार पावसात प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ उद्भवली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.



