क्राईममहाराष्ट्र

पुण्यात सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून जावयाने आयुष्य संपवलं

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने टोकाचं पाऊल उचलत (Pune Crime News) आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. एकीकडे राज्यासह देशभरात विवाहित महिलांच्या बाबतीत होणारे अत्याचार आणि आत्महत्या वाढत असतानाच (Pune Crime News) सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याच्याही घटना समोर येत आहेत. ही घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली आहे. या तरुणाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सासरच्या कुंटुबातील सदस्यांसह सहा जणांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या  केलेल्या तरूणाचे नाव तेजस तानाजी चाळेकर (वय 27, रा. बिबवेवाडी) असे आहे. याबाबत शिला तानाजी चाळेकर (वय 47, रा. नसरापूर, भोर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ऐश्वर्या विजय पिंगळे, विजय नामदेव पिंगळे, शीतल विजय पिंगळे (सर्व जण रा. पौड, ता. मुळशी), ऋग्रीकेश उर्फ भाई सुनील खेडकर, सुनील शिवलिंग खेडकर, भूषण सुनील खेडकर (रा. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे.

फिर्यादी शिला चाळेकर या आशा सेविका असून त्या बिबवेवाडी परिसरात आपल्या कुंटुबासोबत राहतात. 8 ऑगस्ट 2020 मध्ये त्यांचा मुलगा तेजस आणि ऐश्वर्या यांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर तेजसच्या घरच्यांनी दोघांचे धार्मिक पद्धतीने लग्न लावून दिले. त्यांच्या लग्नानंतर दोन महिन्यातच त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. कोरोनाच्या काळात तेजसचे दुकान बंद पडल्याने ऐश्वर्या आणि तेजस यांच्यातील भांडण वाढत गेली.

त्यानंतर ऐश्वर्याला तिचे आई-वडील माहेरी घेऊन गेले. चार महिने माहेरी राहिल्यानंतर पुन्हा ती सासरी आली. मात्र, वाद सुरूच राहिले. ऐश्वर्याने तिच्या घरी आई-वडिलांना बोलावून गोंधळ घातला. त्यानंतर तिने आपल्या आई- वडिलांच्या सांगण्यावरून तेजस विरोधात घटस्फोट व पोटगीचा दावा दाखल केला. तर ऋषिकेश खेडकर हा ऐश्वर्याच्या आई- वडिलांच्या सांगण्यावरून तेजसचा पाठलाग करत होता. तर सुनील खेडकर व भूषण खेडकर असे सर्व मिळून तेजसला मानसिक त्रास देत होते अशी माहिती फिर्यादींनी दिली आहे. सर्व वादावादीमध्ये तेजस हा डिप्रेशनमध्ये गेला होता. या सर्व त्रासामुळे चाळेकर कुटुंबीयांनी घर बदलले. ते लोअर इंदिरानगरमध्ये राहण्यासाठी गेले. मात्र, 9 ऑगस्ट रोजी घरात कोणी नसताना तेजसने राहत्या घरातील पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होतं आहे. पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button