
वैजापुर प्रतिनिधीःग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा नैसर्गिक वातावरणात चांगल्या प्रकारे विकास होत असल्यामुळे सहजरीत्या यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन करू शकतात फक्त त्यासाठी सतत अभ्यास, लेखन, वाचन केल्याने बुद्धीचा मोठा विकास होतो.असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जराड यांनी केले. न्यू हायस्कूल तलवाडा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर मगर यांच्या अध्यक्षतेखाली कवी अशोक गायकवाड यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन छावा् संघटनेचे किशोर मगर यांच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी कवि अशोक गायकवाड यांनी आपल्या खुमसदार शैलीत कविता सादर करुन छोट्या छोट्या चारोळ्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतल्या आणि तुम्ही देखील कवि होऊ शकतात हे त्यांना दाखवून दिले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास या चारोळ्यामुळे वाढला आणि विद्यार्थी यमक साधून नैसर्गिक वातावरणातील झाडे झुडपावरील कविता करू लागल्याने मंचावरील मान्यवर मंत्रमुग्ध झाले. अनेक मान्यवरांनी आपल्या शैलीत मुलांना मार्गदर्शन केले. नवीन वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना शुभेच्छा म्हणून छावा संघटनेचे किशोर मगर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही पेन भेट दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील निकम, मनोहर मगर, हरिभाऊ मगर, भाऊसाहेब मगर, राजेंद्र मगर, दादाभाऊ मगर, शामराव मगर, मुख्याध्यापक सदाशिव कोकाटे, किशोर मगर, शांताराम मगर, शिवाजी आबा मगर, डॉ. प्रमोद जीवरख, प्रशांत निकम, डॉ. अर्जुन साळुंखे,प्रा.आनंद निकम,आबासाहेब मगर,रामदास मगर, चांगदेव महाराज, नारायण मगर, संदीप गायके, भीमजी पवार, संकेत चव्हाण,नारायण मगर, सोमनाथ मगर, गणेश मगर, आनंद मगर, शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हसन सैय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.पी पोटे यांनी केले.



