मराठवाड़ा

माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान

पैठण,प्रतिनिधीः दर्पण पत्रकार दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी यांच्याकडून पैठणच्या सर्व पत्रकारांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी रोजी सुरु केले. याच बद्दल 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोमनाथ दादा परदेशी यांनी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व पत्रकार बांधवांना हॉटेल न्यू दुर्गाच्या सभागृहात सन्मानित करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पैठण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, मदन आव्हाड, गौतम बनकर, नंदकुमार चव्हाण, रमेश शेळके, दादा गलांडे ,शिवाजी गाडे, सुरेश वायभट ,एकनाथ काळे, बाबा अडसूळ सह सर्व पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button