मराठवाड़ा

लायन्स क्लब चे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

गंगापुर प्रतिनीधी
लायन्स क्लब वाळूज छ. संभाजीनगर  व नॅशनल कॉम्प्युटर अकॅडमी यांच्या  विद्यमाने  नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन  शनिवार दिनांक १३ डिसेंबर  २०२३ रोजी करण्यात आले होते.
या शिबिरात ६७ रुग्णांचे नेत्र तपासणी करण्यात आली पैकी २५ रुग्णांचे मोतीबिंदू आढळून आले, या रुग्णावर  लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
   शिबिराचे उद्घाटन दीप्रज्वलनाने करण्यात आले उद्घाटक म्हणून डॉ. श्रीराम मोरे,माजी नगरसेवक श्यामसुंदर धूत,लायन्स क्लब वाळूज  औरंगाबाद चे  अध्यक्ष योगेश धोत्रे,  कोषअध्यक्ष रणजीत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिरात लायन्स क्लबचे विष्णू जगताप, महेश मोरे लायन्स आय हॉस्पिटल चे प्रज्वल मिठावाल, इम्रान पठाण, अक्षय ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख ला. योगेश धोत्रे यांची प्रास्ताविक केले.सूत्र संचालन  यांनी तर आभार प्रदर्शन रणजीत चव्हाण यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button