मराठवाड़ा

सिडको परिसरात गॅस गळती

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : शहराची लाइफ लाइन असलेल्या जालना रस्त्यावरील सिडको उड्डाण पुलाला आज पहाटे पाच वाजताच्या सुमार गॅस टॅंकर धडकला. त्यातून गॅस गळती होत असल्याने परिसरातील पाच किमीपर्यंत वाहतूक पोलिसांनी बंद केली. शिवाय मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.  या परिसरात दोन पेट्रोल पंप आहेत. तेही बंद करण्यात आले. नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अग्निशमन दलाचे जवान गॅस गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक कॉलेजसमोर आज पहाटे एचपी गॅसचा टँकर उलटून गॅस गळती होत असल्याची घटना घडली. घटनास्थळी सहा पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचेही टँकर दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू आहे.
चिकलठाणा एमआयडीसी परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा डेपो असून, या ठिकाणी टँकरने गॅसचा पुरवठा केला जातो. आज पहाटे साडेसतरा हजार लिटर गॅस असलेला टँकर या डेपोकडे जात होता. सिडको उड्डाणपूल सुरू होत असताना टॅंकर उड्डाण पुलाला धडकला. यात टॅंकर पलटी होऊन त्यातून गॅस गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच
अग्निशमन विभागाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी पोचले. या रस्त्याला जोडणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद केले. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या टँकरवर पाण्याचा मारा केला जात आहे.
इतर जिल्ह्यातून मदत
यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी प्रशासनाने आजूबाजूच्या जिल्ह्यातून
आपत्कालीन मदत वाहन मागवली आहे. दरम्यान, परिसरातील शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत.
—-
ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन
संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली असून, चार तासांसाठी तीन उपकेंद्रांवरील वीजही बंद करण्यात आली आहे. वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सिडको चौकात गॅसची वाहतूक करणारा टँकरचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, गॅस लिक होत असल्याने परिसरातील रस्ते बंद करून वाहतूक रोखणे महत्वाचे असल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर, स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
(((प्रतिक्रिया))))))))
पहाटे 5 वाजून 18 मिनिटांनी कॉल आला होता. घटनास्थळी आमच्या तत्काळ तीन गाड्या दाखल झाल्या. टँकरमधील चालकाला आमच्या टीमने बाहेर काढले. गॅस मोठ्या प्रमाणात लिक होत असल्याने वाहतूक बंद करणे गरजेचं होतं. त्यामुळे याची माहिती पोलिसांना दिली. सोबतच महावितरण विभागाला माहिती देऊन या परिसरातील वीज बंद केली. हा गॅस हवेपेक्षा अधिक जड असल्याने तो जमिनीवरच पसरणार आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. अजूनही मोठा धोका आहे, जोपर्यंत टँकरमधील संपूर्ण गॅस खाली होत नाही तोपर्यंत धोका आहे.
– शिवाजी झणझण, अधिकारी, अग्निशमन दल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button