महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

…. तर मविआतील सर्वांचं वस्त्रहरण होईल – नितेश राणे

सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते.  सचिन वाझे यांनी सत्य विधान केलं आहे. सत्य बोलायला सचिन वाझेंनी बोलायला सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांनी हिंमत असेल तर समोर येऊन खुलासा करावा.  सगळ्या गोष्टीची खुलासा करण्याची हिंमत अनिल देशमुख यांनी करावी, असे आव्हान नितेश राणे यांनी अनिल देशमुखांना दिले आहे.

ते पुढे म्हणाले की सचिन वाझे यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे. सचिन वाझे जसं जसं बोलत जातील, तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल. त्यांनी शिवसंकल्प नाव ठेऊ नये, अली संकल्प मेळावा नाव ठेवावे. अली संकल्प मेळावा त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीतील सर्वांच्या कुंडल्या आहेत. फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button