क्राईम

यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ लाँग मार्च, उरण बंद

यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ आज उरण बंदची हाक देण्यात आली आहे. यशश्रीच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या तरुणीच्या मारेकऱ्यांना शोधावं म्हणून आज स्थानिक नागरिक लाँग मार्च काढणार आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या झाली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला होता. तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. यशश्रीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. या घटनेनंतर उरणमधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज उरण बंदची हाक देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button