महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

‘त्या’ आमदारांना विधानसभेचे तिकीट देवू नका; हायकमांडचे पटोले यांना आदेश

विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parisad Election)   क्रॉस वोटिंग (Cross Voting) करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचा (Congress)   अखेर पत्ता कट करण्यात आला आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना  विधानसभेला (Vidhan Sabha Election) तिकीट देऊ नका, असे आदेश  काँग्रेस हायकमांडने दिले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अखेर त्या आमदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली  आहे.

विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक देखील झाली.  या मागणीनंतर फुटीर आमदारांचा थेट पत्ताच कट केला आहे. काँग्रेस पक्षाकडून 5 आमदाराला विधानसभा निवडणुकीत पक्षाच तिकीट देऊ नका, असे  काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना आदेश दिले आहेत. ज्या आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे त्या आमदारांच्या पाच मतदार संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, असे देखील आदेश दिले आहेत.

सुलभा खोडके,  झिशान सिद्दीकी,  हिरामन खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे यांचा पत्ता कट होणार आहे तर अमरावती,  इगतपुरी (अ.जा), वांद्रे पूर्व, नांदेड दक्षिण, देगलूर (अ.जा) येथून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button