
पैठण प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रास्त्रांची माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने गुरुवार दिनांक ४ जानेवारी रोजी पैठण पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलीस विभागाशी संबंधित सर्व माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केले होते.
पैठण शहरातील जिल्हा परिषद कन्या हायस्कूल जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल व जैन इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी पोलिसांशी संवाद साधून विविध प्रकारचे शस्त्र हातात घेऊन हाताळले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन मार्फत सुरू असलेले थेट कामकाज जवळून पाहिले.पैठण शहरातून शालेय विद्यार्थ्यांची बँड बाजा रॅली काढून अनोख्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मदने, पोलीस हवालदार सुधीर ओव्हाळ, विष्णू गायके, अनिल गायकवाड, राजेश आटोळे, नरेंद्र अंधारे, नुसरत शेख, लक्ष्मण पुरी महिला पोलीस हवालदार कृष्णाई शिंदे, सुनीता चेके तसेच पोलीस मुख्यालय येथील राखीव पोलीस निरीक्षक वाघमोडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोरे तसेच बँड पथकातील पोलीस हवालदार सुदर्शन पवळे, दीपक पवळे, चंद्रकांत जाधव, राजेंद्र घोडके यांनी सहभाग घेतला होता.



