
पैठण,प्रतिनिधीःवारकरी शिक्षणाचे धडे घेणार्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पैठण शहरातील नारळा भागात घडली आहे.पैठण शहरातील नारळा भागात माऊली वारकरी शिक्षण संस्था असून या संस्थेमध्ये नेवासा तालुक्यातील एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षणाचे धडे घेत आहे.याच अल्पवयीन मुलावर नारळा येथील सागर सुभाष पहिलवान वय वर्ष 30 या तरुणाने मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी रात्री पेट्रोल पंपाच्या पाठीमागे व गीता मंदिराच्या बाजूस असलेल्या झाडाझुडपात नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला.या घटनेमुळे पैठण शहर तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली असून वारकरी शिक्षण क्षेत्रात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.सदरील अनैसर्गिक अत्याचार करणार्या सागर पहिलवान या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.या अल्पवयीन अत्याचार घटनेमुळे वारकरी क्षेत्रात तसेच भाविक भक्तामध्ये संतापाची लाट उसळली असून सागर पहिलवान या नराधमास कडक सजा देण्यात यावी अशी मागणी धार्मिक क्षेत्रातून होताना दिसत आहे.
———————————-
प्रतिक्रिया
घटनेची माहिती समजताच पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने ताबडतोब क्शन घेण्यात आली असून आरोपी सागर पहिलवान यास अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे या तपास करत असून पोलिसांकडून कडक पाऊल उचलले जातील.
-संजय देशमुख, पोलीस निरीक्षक पैठण


