मराठवाड़ा

दुचाकी पार्किंगचा भाविकांना त्रास

पैठण (शिवाजी गाडे)ः
बाहेरील नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार कमानी समोर मोटरसायकलची पार्किंग असल्याने दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांना वारकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पैठण येथील बाहेरील नाथ समाधी मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त येत असतात. महाराष्ट्रातील अनेक भाविक एसटी बस द्वारे दर्शनाला येतात तर अनेक भाविक खाजगी चार चाकी वाहन व दुचाकी वाहनाने पैठणमध्ये दाखल होतात.चार चाकी वाहने पैठण नगरपालिकेच्या पार्किंग मध्ये पार्किंग केली जातात परंतु दुचाकी मोटरसायकलवर आलेले भाविक मात्र नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार कमानी समोरच गाड्या उभ्या करतात.नाथ मंदिराच्या व्यवस्थापनाकडून या ठिकाणी कर्मचारी अथवा सेक्युरिटी गार्ड दिला गेला नाही. मोटरसायकल पार्किंगची कसलीही सुविधा व नियम करण्यात आलेले नसल्याने अनेक दुचाकी वाहने या प्रवेशद्वार कमानी समोर उभे केलेली दिसून येतात.अक्षरशः शेकडो दुचाकी वाहने प्रवेशद्वारासमोर उभी केल्याने महाराष्ट्रभरातून आलेल्या वृद्ध दिव्यांग महिला भाविक भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.या ठिकाणी उभी करण्यात आलेली बहुतेक दुचाकी वाहनेही स्थानिक पैठण शहर व तालुक्यातील भाविकांची असल्याने या दर्शनासाठी आलेल्या व्यक्तींना कितीही समजून सांगितले तरीही ते ऐकत नसल्याचे माहिती नाथ मंदिर विश्वस्त दादा बारे यांनी दिली.दुचाकी मोटरसायकल साठी नाथ मंदिर प्रवेशद्वार समोरील लिंबाच्या झाडा जवळ बाजार तळावर पार्किंग करावी अशी मागणी भाविक भक्त आणि वारकरी करत आहेत.अस्ताव्यस्त मोटरसायकलची पार्किंग करणार्‍या दुचाकी स्वरांना कोणीही मज्जाव दंड करत नसल्याने हा सगळा गोंधळ होत असल्याची माहिती या ठिकाणी असलेल्या वारकरी आणि भाविक भक्तांनी दिली.
————————————————–
प्रतिक्रिया
पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था उभी करून या मुख्य प्रवेशद्वार कमानी समोर एक कर्मचारी दिला जाईल. पैठण शहर व तालुक्यातील भाविकांनी या ठिकाणी स्वतःहून पार्किंग न करता सहकार्य करावे.
-दादा बारे,नाथ मंदिर विश्वस्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button