
पैठण प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती पुणे जिल्ह्यातील तिकोना किल्ल्यावर दिव्यांगांच्या वतीने साजरा करण्यात आली.
१८ फेब्रुवारी रोजी मावळ प्रांतात मुळशी तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील तिकोना किल्ल्यावर शिवुर्जा प्रतिष्ठानच्या दिव्यांग बांधवांनी एकत्र येत शिवजयंती साजरी केली
शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील अंध अपंग व्यक्तींची गडकिल्ले भ्रमण संवर्धन करणारी संस्था असून गेल्या दहा वर्षापासून विविध ऐतिहासिक गड किल्ल्यावर भटकंती उपक्रमाचे आयोजन केल्या जाते.
छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या बेलाग बुलंद व कणखर असलेल्या तिकोना किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
शिवुर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली व सचिव कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बारा दिव्यांगांनी एकत्र येत तिकोना गडावरील बालेकिल्ला गडमाथ्यावर असलेल्या महादरवाजामध्ये शिवजयंती उत्सव सोहळा पार पडला.
शिवप्रतिमेचे पूजन मोतीराम आवारे ,शोभा आवारे यांच्या हस्ते दुर्ग पूजन अंजली प्रधान तर शिव आरती सतीश आळकुटे, सागर बोडके ,मच्छिंद्र थोरात ,जीवन टोपे यांच्या हस्ते व गडकरी पुजारी सुजित मोहोळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
पुण्यापासून ६० किमी अंतरावर व समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर असलेल्या तिकोना किल्ल्यावर स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर किल्लेदार होते.
गडाच्या बालेकिल्ल्यावर महादेवाचे मंदिर, पाण्याचे तलाव, तुळजाई देवीचे मंदिर , उभ्या पाषाणात कोरलेली बजरंग बलीची भव्य मूर्ती, कोरीव लेणी अंतर्गत भुयारी पाण्याची टाकी, सैनिकी देवड्या , धान्याचे कोठार, खणखणीत आणि बुलंद तीन महादरवाजे ,बुरुज आणि तटबंदी सह जुन्या वाड्याचे अवशेष शिल्लक आहेत.
यावेळी दिव्यांगांनी भगव्या टोप्या, भगवे झेंडे ,पारंपारिक पोशाखासह छत्रपती शिवरायांचा जयघोष करत अनोखी शिवजयंती साजरी केली.
पैठण येथील शिवाजी गाडे, बीड येथील कचरू चांभारे, कल्याण घोलप, मोतीराम आवारे , शोभा आवारे, भावना आवारे, नाशिक येथील अंजली प्रधान, सागर बोडके, पुणे येथील सतिश आळकुटे, जीवन टोपे, मच्छिंद्र थोरात शिरूर, शरद खिल्लारी,जनार्दन पानमंद कर्जत यांनी सहभाग घेतला होता.



