
लासुर स्टेशन सांवगी चौक वसुसायगावला रास्ता रोको आंदोलन
गंगापुर प्रतिनीधी
नागपूर-मुंबई महामार्ग सावंगी चौकात सकल मराठा समाज लासुर स्टेशन पंचक्रोशीच्या वतीने सगे सोयऱ्यांचा अध्यादेश तात्काळ पारित करण्यात यावा,अंतरवाली सह महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे,हैदराबाद गॅझेट मधील नोंदी तात्काळ लागू करण्यात याव्या,या मागणीसाठी एक तास चक्का जाम आंदोलन करुण मंडळ अधिकारी श्रीमती भंडारे,पोलिस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नितीन कांजुणे,महेश गुजर,दिगंबर गोटे,दिलीप पवार,दत्तु डुबे,दत्तू पवार, दीपक पवार,योगेश तायडे,
प्रवीण पवार,आदेश रणयेवले,जालिंदर पवार,बाळू डूबे,संतोष औटे,वसंत डूबे,वैभव चव्हान,कृष्णा कर्हाळे,निवृती कर्हाळे,विजय जगताप,गणेश पवार,
संतोष चव्हाण,दादासाहेब औताडे,मयुर शिरसाठ,
जीवन देशमुख,अमोल बनकर,पांडुरंग कदम, शरद कर्हाळे,संजय पवार,शिवाजी चव्हाण,आकाश कर्हाळे,
गणेश गाजरे,भागीनाथ कर्हाळे याच्या सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सिल्लेगाव पोलीस स्टेशन निरीक्षक गोरखनाथ शेळके,बेदरे,वाघ,शेख,किर्तीकर सह इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



