मराठवाड़ा

मंत्री संदिपान भुमरे यांना लोकसभेच्या तिकिटाची लॉटरी लागणार?

पैठण प्रतिनिधी शिवाजी गाडे
पैठणचे आमदार तथा राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना लोकसभा तिकिटाची लॉटरी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आचारसंहिता अचानक कधीही लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून कन्नडचे आमदार वगळता बहुतेक आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यात संदिपान भुमरे हेच एकमेव बाहुबली नेते आहेत.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात लोकसभेसाठी भाजपने उमेदवार उभे केले असून संभाजीनगर ची जागा शिवसेनेसाठी सुटणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
पालकमंत्री संदिपान भुमरे यांना आज तातडीने मुंबईला बोलवले गेले असल्याने छत्रपती संभाजी नगर लोकसभा तिकिटाची लॉटरी मंत्री संदीपान भुमरे यांनाच लागणार असल्याचे जवळपास फायनल झाले आहे.
आज रात्रीपर्यंत काय अपडेट आणि बातमी येते याकडे संपूर्ण पैठण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button