मराठवाड़ा

सह्याद्री टाइम्सची बातमी खरी ठरली..

पैठण ( शिवाजी गाडे):
श्री संत एकनाथ सहकारी कारखान्याच्या चेअरमन पदी सीए सचिन घायाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संत एकनाथच्या चेअरमन पदी सचिन घायाळच होणार असल्याचे वृत्त दैनिक सह्याद्री टाइम्स १७ फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम दिले होते. ते अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सचिन घायाळ यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
कै पंढरीनाथ पाटील सिसोदे यांनी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मोठ्या कष्टाने उभा केला होता.
या श्री संत एकनाथ कारखान्याच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून कारखान्यावर संचालक म्हणून सचिन घायाळ आणि तुषार सिसोदे यांच्या पॅनल ने २१ पैकी २१ जागा जिंकल्या होत्या.या २१ पैकी तब्बल १९ संचालक हे सचिन घायाळचे समर्थक असुन फक्त दोघेजण तुषार सिसोदे यांचे समर्थक असल्याने कारखान्यावर सचिन घायाळच चेअरमन होणार असे वृत्त प्रकाशित केले होते.पैठण तालुक्यात व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तुषार शिसोदे हेच पुन्हा चेअरमन होणार असल्याची चर्चा सुरू होती. कारण तुषार शिसोदे हे संत एकनाथ कारखान्याचे संस्थापक कै. पंढरीनाथ पाटील शिसोदे यांचे वंशज असल्याने तुषार शिसोदे यांना पुन्हा संधी मिळणार अशी चर्चा सुरू होती.
परंतु श्री संत एकनाथ कारखाना सीए सचिन घायाळ यांनी भाडे तत्वावर चालविण्यास घेतलेला असून निवडून आलेले सर्व संचालक सचिन घायाळ समर्थक असल्याने चेअरमन पदी पुन्हा तुषार सिसोदे येणारच नाहीत असे वृत्त दैनिक सह्याद्री टाइम्स दिले होते.
मुत्सद्दी आणि महत्वकांशी असलेल्या सचिन घायाळ हे दुसऱ्यांदा तुषार सिसोदे यांना संधी देणारच नाहीत हे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातुन जाणवत होते. अगदी तेच वृत्त खरे ठरले. चेअरमन पद न मिळाल्याने तुषार सिसोदे हे नाराज असल्याची चर्चा पैठण तालुक्यात व ऊस उत्पादक शेतकऱ्यात सुरू आहे.
———————————————————————————————————————–
चेअरमन पद न मिळाल्याने मी नाराज नाही उलट सचिन घायाळ यांना चेअरमन करावे यासाठी मी स्वतः सूचक झालो आहे..
-तुषार शिसोदे, माजी चेअरमन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button