मराठवाड़ा

पैठणः दत्ता गोर्डे यांनी बांधलं ‘शिवबंधन’

पैठण,प्रतिनिधीः माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे बाहुबली दिग्गज नेते दत्ताभाऊ गोर्डे यांनी मातोश्रीवर आज शेकडो समर्थकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.मूळचे शिवसैनिक असलेले दत्ता गोर्डे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर दत्ता गोर्डे यांनी गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादी काँग्रेस मधून पालकमंत्री संदीपान भुमरे यांना काट्याची टक्कर दिली होती.शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर दत्ता गोर्डे आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्यात कट्टर राजकीय वैमनस्य निर्माण झाले आहे.
मूळ शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडल्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन एकनाथ शिंदे सोबत घरोबा केला.शिवसेना फुटी नंतर मूळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दत्ता गोरडे यांनी प्रवेश करावा अशी मागणी पैठण तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी केली होती.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पाडल्याने दत्ता गोरडे यांनी देखील मूळ शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे व विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली व पुढाकाराने दत्ता गोरडे यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले.शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी दत्ता गोरडे यांच्यासोबत पैठण येथून शेकडो गाड्यांचा ताफा आणि समर्थक मुंबई येथे पोहोचले आहेत. पैठण शहरासह तालुक्यातील अनेक सरपंच नगरसेवक चेअरमन पंचायत समिती सदस्य शेकडो दिग्गजांनी प्रवेश घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद या निमित्ताने वाढणार आहे.सदरील प्रवेश घेतेवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, पैठण तालुकाप्रमुख मनोज पेरे
यांच्यासह पैठण व संभाजीनगर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या अनेक पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यांनी घेतला प्रवेश▪️
माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, माजी सभापती सुरेश दुबाले, पिआर थोटे, निवृत्ती बोबडे ,चनकवाडी सरपंच भगवान कबाडी, मराठा महासंघाचे आतिश गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश बनसोडे, सरपंच सचिन राजपूत, संजय निंबाळकर, सदाशिव गोरडे सोलनापूर, माजी सरपंच उंचेगाव शिवाजी लांडगे, माजी संचालक संभाजी अत्रे, राजू बोबडे , असलम पठाण, रियाज पटेल कारकीन, निसार पठाण नवगाव ,ज्ञानेश्वर मोगल निलजगाव ,माजी सरपंच अशोक औटे आपेगाव, संजय लभांडे नांदलगाव, संजय सदावर्ते नांदर, समीर पटेल ,सतीश पल्लोड, अनिस पटेल कोळीबोडखा, कैलास कळसकर ,संदीप हनवते, दीपक बनकर,नितीन गिधाने ,सुनील त्रिभुवन,  बद्री मामा गोरडे बालानगर, मुजावर शेख, आरिफ भाई ,शेख सलीम ,अतिक अवघड ,प्रवीण शिंदे ,आत्तार शेख बिडकीन, वामन साठे बिडकीन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button