
पैठण : शिवाजी गाडे
पैठण तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पंचायत समिती शिक्षण विभाग पैठण यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या,
चटोपाध्याय पात्र शिक्षक शिक्षिका यांची वेतन निश्चिती त्वरीत करणे.
एन.पी.एस.धारक शिक्षकांची फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युटी विकल्पाची नोंद मूळ सेवा पुस्तिकेत त्वरित करण्यात यावी.
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन तालुक्यातील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असल्याणे सर्वांच्या प्रशिक्षणाची नोंद मूळ सेवा पुस्तिकेत घेण्यात यावी. या करता शिक्षक संघाकडून आपणास शिक्का तयार करून देण्यात आलेला आहे त्याचा स्वीकार करुन सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या प्रशिक्षणाची नोंद सेवापुस्तीकेत करण्यात यावी.
या वेळी शिक्षक संघाच्या तालुका कार्यकारिणीच्या नवीन रचनेनुसार तालुका संघटक म्हणून धोंडीभाऊ सुखदेव यांची सर्वानुमते निवड करून संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. इत्यादी विविध मागण्याचे निवेदन पंचायत समिती शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक- सतीश दादा आखेगांवकर,यांनी स्वीकारुन शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याने त्वरीत मार्गी लावल्या जातील असे अश्वासित केले.
निवेदनावर सह्य व निवेदन देतांना प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते-श्रीराम घोलप,जेष्ठ मार्गदर्शक-पोपट फुंदे,कैलास वाकडे,तालुकाध्यक्ष-योगेश शिसोदे,सरचिटणीस-समशेर पठाण,कार्याध्यक्ष-नारायण बहिर, तालुका कार्यकारी अध्यक्ष- जयसिंग खेडकर,तालुका संपर्क प्रमुख-मयुर शिसोदे,तालुका उपाध्यक्ष-बाबासाहेब बडे,शहर प्रमुख-अहेमद शेख,तालुका संघटक-धोडीभाऊ सुखदेव,तसेच ज्येष्ठ शिक्षक-संभाजीराव कर्डिले, ढाकणे,बाळासाहेब पाखरे,ढोले, शकील पठाण,कैलास मडके, बोराडे,इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



