महाराष्ट्रराजकारण

जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालतात

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. त्यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेतील. या तीन दिवसांमध्ये  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा उद्धव ठाकरे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च सुनावणी दिल्लीत होत आहे, त्या पार्श्वभूमीवरही ते दिल्ली दरबारी आहेत. मात्र, ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यावर आता शिंदे गटाकडून टीका करण्यात आलीय.

जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणत होते, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत, असे म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसेच, संजय राऊत हे तर वाढपीच्या भूमिकेत आहेत. कोणाला लोणचं द्या, कोणाला पाणी भरून दे… जे एकेकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागा वाटपासाठी येत होते, आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असे म्हणत संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button